बातम्या

मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचं अजूनही आंदोलन सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार असल्याने खुल्या प्रवर्गासह विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परिपत्रक काढून प्रवेश प्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. त्यासाठी १३ मेपासून पुढील सात दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आल्याचे राज्य सामाईक  प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या तब्बल ३५०० विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने ही प्रवेश प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित करून उर्वरित पाच दिवसांत पूर्ण होणे अशक्‍य आहे. हा निर्णय घेऊन सरकार खुल्या प्रवर्गासह इतर प्रवर्गांतील विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरून राबवण्यात येत असल्यामुळे राज्यातील शैक्षणिक वर्ष एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एक वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यापूर्वी मिळालेले प्रवेश रद्द झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याच्या तक्रारी घेऊन सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सीईटी सेल कार्यालयावर मंगळवारी (ता. १४) सायंकाळी धडक दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करण्यात येत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियेतील इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता  येईल का, याबाबत वकिलांचा सल्ला घेणार आहोत. त्याचप्रमाणे सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करून आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार आहोत. 
- डॉ. दीक्षा थोरात, वैद्यकीय विद्यार्थिनी

मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया २५ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; मात्र प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा अधिकार नसल्याने सरकारला सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे. सरकारकडून ठोस आश्‍वासन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १४) आठव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. प्रवेश निश्‍चित होईपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Web Title: Medical students of Maratha community have started agitation at Azad Maidan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबो, अधिकारी महिलेकडं घबाडच सापडलं! मुंबई एअरपोर्टवर 25 किलो सोनं जप्त | Mumbai Airport

AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT